News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र शासन पुरस्कृत ग्रामीण भागातील गरजू लोकांना घरकुल मंजुरी देतांना प्रतीक्षा यादी 'ड' नुसार मंजूर करण्यात आली असून यादीतील अनुक्रमांकानुसार घरकुलाचे वाटप इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती/जमाती यांना या योजनेचा लाभ लोकसंखेच्या प्रमाणानुसार होणार आहे. परंतु मंजूर केलेल्या यादीनुसार गरीब,गरजू,विधवा व परीतक्त्या असलेल्या महिलांना होत नसल्याने असे लाभार्थी घरकुलाच्या योजनेपासून पुर्णतः वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी सन-२०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार गरीब,गरजू,विधवा परीतक्त्या असलेल्या लाभार्थी यांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार मंजूर झालेल्या घरकुलचा लाभ देण्यात यावा अशी मागणी मुल तालुक्यातील मौजा फ़िस्कृटी येथील ग्राम पंचायत सरपंच नितीन गुरनुले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
फ़िस्कृटी येथील मंजूर करण्यात आलेल्या घरकुलच्या यादीमध्ये इतर मागास वर्गासाठी ८० घरकुल, अनुसूचित जातीसाठी ४ याप्रमाने मंजुरी दिली असून मंजूर यादीतील घरकुलाचा लाभ देतांना गावातील अतिशय गरीब गरजू आणि विधवा व परीतक्त्या महिलांचा प्राधान्याने विचार व्हावा त्यांना घरकूला पासून वांची ठेऊ नये अशी मागणी तथा विनंती फ़िस्कृटी येथील सरपंच नितीन गुरनुले यांनी केली आहे.
