News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - मुल नगरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाण्याकरिता 1) कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ 2 ) पंचायत समिती जवळ 3) गांधी चौक व 4) पोस्ट ऑफिस जवळ R.O प्लांट बसविण्यात आले. सदर प्लांट बसविण्याकरिता अंदाजे 50 ते 60 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे.
परंतु लाखो रुपये खर्च करून सदर प्लांट चा मूल शहरातील नागरिकांना कोणताही फायदा दिसून येत नाही. मागील एक वर्षापासून सर्व R.O प्लांट बंद आहेत. उन्हाळा सुरू झालेला असताना मुलच्या नागरिकांना थंड पाणी सुद्धा मिळत नाही ती वस्तुस्थिती प्रशासनाला माहित असून सुद्धा याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. फक्त शासन स्तरावर दाखविण्याकरिता शुद्ध पाण्याचे प्लांट बसविले आहेत असा नागरिकांना प्रश्न पडलेला असून जनतेने कराच्या स्वरूपात दिलेल्या रकमेची उधळपट्टी करण्यासाठी प्लांट आहेत का? असे नागरिकांनी बोलून दाखविले आहे. Ro water plant
करिता मुल नगरात नागरिकांसाठी शुद्ध पाण्याचे पिण्यासाठी लावण्यात आलेले चारही प्लांट त्वरित सुरु करण्यात यावे अन्यथा सदर प्लांट काढून आपल्या कार्यालयात जमा करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मागणी नागरिकांच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष कांग्रेस नेते राकेश रत्नावार यांनी ऐका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, कांग्रेस शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे,शुभम वाढई,स्वप्नील कोरडे, सभापती पुरुषोत्तम भुरसे, नितीन अलगूनवार,विकास कांमनपल्लीवर, सुशांत भोयर,गौतम जीवने, प्रभाकर धोटे, कांग्रेस शहर अध्यक्ष सुनील शेरकी उपस्थित होते.

