News 34 chandrapur
वरोरा :- राजकीय पुढाऱ्यांचा इन्कम सोर्स काय? हा प्रश्न सर्वाना पडलेला असतो, याचं साधं सरळ उत्तर म्हणजे कुणी मजूर, शेतकरी तर कुणी व्यापारी मात्र आता शपथपत्रात राजकारण म्हणजे जणू पैसे कमविण्याचा धंदा झाला की काय? असे चित्रच सध्या दिसत आहे. Shivsena
राजकारणात गेल्यावर मोठे आंदोलन उभे करीत कामाची मागणी व या माग्नीसोबत पैश्यांची मागणी करणं हे काही नवीन नाही आहे. Ncp speakes
असाच एक प्रकार वरोरा तालुक्यात उघडकीस आला, सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे, ज्यामध्ये कांग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने युती करीत सत्ता स्थापन केली.
अशीच राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांची युती वरोऱ्यात चांगलीच रंगली आहे. Bs ispat
मौजा सालोरी येथील BS इसपात कम्पनी विरोधात आंदोलन पुकारून शिवसेनेचे मनीष जेठाणी व राष्ट्रवादी कांग्रेसचे सरपंच हर्षल निब्रड यांनी आंदोलन शांत करण्याच्या बदल्यात कामाची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
इतकेच नव्हे तर BS इसपात कंपनीने मनीष जेठाणी व हर्षल निब्रड यांचे विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. Political contract
मनीष जेठाणी हे शिवसेनेचे जिल्हा चिटणीस पदावर असून हर्षल निब्रड राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी सह सरपंच आहे.
आंदोलन करणार नाही आम्हाला कंत्राट द्या अशी थेट मागणी या राजकीय पुढाऱ्यांनी कंपनिसमोर केली, मात्र कंपनीचे HR मनीष कातनगले यांनी दोघांविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला.
हर्षल निब्रड यांनी कंपनीत कॅन्टीन व ट्रॅक्टर द्वारे पाणी मारण्याच्या कामासाहित पैश्याची मागणी केली. सदर संभाषणाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे.
या सर्व प्रकारावर शिवसेनेचे मनीष जेठाणी यांनी कंपणीविरुद्ध पोलीस उपविभागीय अधिकारी यांचेकडे तक्रार केली असून त्यामध्ये माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करण्याचा हा कट असल्याचे म्हंटले आहे.
सदर आंदोलन अपयशी व्हावे यासाठी कंपनीने केलेला हा प्रकार असून माझी व पक्षाची बदनामी करण्याचा कंपनीचा प्रयत्न असून त्यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनीष जेठाणी यांनी केली आहे.
नागरिकांच्या हितार्थ आंदोलन करून आपले हित साध्य करण्याचे काम सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
जर राजकीय पुढारी प्रामाणिकपणे नागरिकांच्या समस्येविरोधात लढले तर या देशात कुठेही समस्या उदभवणार नाही.
