News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- राज्यात माळी समाज हा ओबीसीमधील सर्वात मोठा घटक व संख्येने राज्यातील दुसऱ्या क्रमांकावरचा समाज आहे. असे असतांना आतापर्यंत संख्येच्या योग्य प्रमाणात आरक्षण मिळालेले नाही. एवढेच नव्हेतर राजकीय प्रतिनिधित्व सुद्धा डावलण्यात आले आहे.
Obc community
Obc community
यासाठी अशीच अवस्था माळी समाजाची राहिली तर आजच्या व भविष्यातील तरुण पिढीपुढे फार मोठा धोका उभा राहणार आहे. करिता भविष्यातील संभाव्य आरक्षणाचा धोका टाळण्यासाठी माळी महासंघाने समाज संघटनेचे व एकतेचे दंड थोपटले असून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष श्री.अरूण तिखे व इतर पदाधिकारी यांनी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून समाज बांधवासोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करून आगामी पाच वर्षातील विकासासाठी 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार केले जाईल. Mahasampark Abhiyan
वर्षभर हा संवाद चालेल, असेही अविनाश ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दिनांक १६ मे, २०२२ रोज सोमवारला चंद्रपूर दौऱ्याच्या निमित्ताने माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरूण तिखे, विश्वस्त रवींद्र अंबाडकर, नानासाहेब कांडलकर, काळुराम गायकवाड, कैलास महाजन, भारत माळी, संतोष जमदडे, वर्षा गोडे, वनिता लोंढे, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डाँ. एन.एस. कोकोडे, हिरामण भुजबळ, श्रीकृष्ण गोरडे, शरद पेठकर, डॉ. संजय घाटे, प्रमोद तांबे, विभागीय अध्यक्ष माजी उपविभागीय अधिकारी, चंद्रकांत बोरकर, अतुल क्षीरसागर, दिनेश टाकरखेडे राजेश जावरकर यांचा चंद्रपूर दौरा १६ मे २०२२ ला दुपारी १-०० वाजता ब्रम्हपुरीकडे प्रस्थान ३-०० वाजता पदाधिकारी व समाज बांधवासोबत, शिक्षण, बेरोजगारी, आरक्षण, औद्योगिक, कृषी विषयक, स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व, इत्यादी विषयावर सुफले यांचेकडे संवाद बैठकिमध्ये चर्चा करून सायंकाळी ४-०० वाजता मुल मार्ग - बल्लारपूरकडे प्रस्थान आणि ६-०० वाजता प्रभू साईनाथ देवस्थान येथे जिल्हाध्यक्ष निलेश खरबडे यांच्या संयोजनात संवाद सभा व संपर्क बैठकीचे आयोजन,रात्री ९-०० वाजता चंद्रपूर आगमन व १७ मे ला सकाळी चर्चा, १०-०० वाजता भद्रावती मार्ग वरोरा येथे बैठक चर्चा करुन यवतमाळ जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहेत तरी माळी समाज बांधवांनी व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आयोजित बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घ्यावा अशी विनंती माळी महासंघाने केली आहे.
