चंद्रपूर - चंद्रपुरातील प्रसिद्ध ट्रान्सपोर्ट व्यवसायी यांच्या व्यवस्थापकाला अज्ञात युवकांनी पोलीस मुख्यालयासमोर लुटल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांच्या व्यवस्थापकाने पोलीस मुख्यालय समोर स्थित HDFC बँकेतून 12 लाख रुपये काढायला गेला, पैसे काढल्यावर आपल्या दुचाकी वाहनाकडे परत आले असता काही अज्ञात युवकांनी तुमच्या दुचाकी वाहनाचे ऑइल लिक होत आहे असे सांगितले असता ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने खाली बघितले, याच संधीचा फायदा घेत त्या युवकांनी पैश्याची बॅग उडविली. सदर युवक यांनी चेहरा झाकून ठेवला होता. Chandrapur police headquarters
व्यवस्थापकाने पैश्याची बॅग युवकांनी लंपास केल्यावर आरडाओरडा केला मात्र त्यांनी लगेच तिथून पळ काढला.
विशेष म्हणजे मुख्यालय समोर परिसरात रामनगर पोलीस स्टेशन आहे, त्या परिसरात लुटमारीची घटना म्हणजे पोलिसांना आरोपीनी एक प्रकारचे आव्हान दिले आहे.
सध्या रामनगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
.jpeg)