चंद्रपूर/दुर्गापुर - घरी जेवण करीत असताना 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 10 मे ला दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये घडली.
मात्र 3 वर्षीय चिमुकलीच्या आईने त्या बिबट्यावर काठीने प्रहार करताच, त्याने जंगलात धूम ठोकली.
10 मे मंगळवारी रात्री 9 वाजता 3 वर्षीय आरक्षा पोप्पूलवार ही घरी जेवण करीत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्यात आरक्षा च्या आईने मुलीला वाचविण्यासाठी त्या बिबट्यावर काठीने प्रहार करीत हल्ला केला. Wild animal
त्या बिबट्याने तिथून धूम ठोकली, मात्र आरक्षा ही गंभीर जखमी झाली, तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मागील अनेक महिन्यापासून बिबट्याने दुर्गापुरात चांगलीच दहशत माजविली आहे, आतापर्यंत अनेकांचे जीव बिबट्याने घेतले. Leopard attack chandrapur
घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर आपल्या चमुसह दुर्गापुरात दाखल झाले मात्र बिबट्याच्या हल्ल्यानंतर दुर्गापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, गावकऱ्यांनी वनविभागाच्या चमुला घेराव करीत त्यांना डांबले, जो पर्यंत त्या बिबट्याला ठार मारणार नाही तो पर्यंत आम्ही वनविभागाच्या कर्मचाऱ्याला सोडणार नाही असा इशारा दिला.
