चंद्रपूर - वर्ष 2013 पासून सुरू झालेल्या कलकाम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नामक कंपनीची सुरुवात करीत हजारो गुंतवणूक दारांना गंडा घातला.
सदर कंपनीने विदर्भातील चंद्रपूर येथे कार्यालय सुरू करीत अनेक एजंटची नेमणूक केली, विदेश रामटेके व विजय येरगुडे हे विदर्भाचे काम बघत होते.
त्यांनी एजंट यांची नेमणूक करीत कम्पनी विविध क्षेत्रात कार्य करते जर नागरिकांनी यामध्ये पैसे गुंतविले तर त्यांना चांगला परतावा मिळेल अशी दिशाभूल करणारी माहिती दिली. Financial fraud
गुंतवणूक दारांकडून कोट्यवधी रुपये बचत ठेव च्या नावाने गुंतवणूक करून सदर कंपनीने कोरोना काळात आर्थिक अडचण असल्याचे भासवत गुंतवणूकदारांना पैसे देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली.
नागरिकांचे पैसे परत मिळणार असे खोटे आश्वासन रामटेके व येरगुडे यांनी गुंतवणूकदारांना दिले.
मात्र कुणाचेही पैसे परत मिळत नसल्याने सदर प्रकरणी शरद पवार विचार मंचने प्रदेशाध्यक्ष अमित धमाळ यांच्या पुढाकाराने सरळ गृहमंत्रालय गाठले व कलकाम कंपनी विरोधात तक्रार दिली. Kalkam infrastructure limited
गृहमंत्री पाटील यांच्या कार्यालयाने प्रकरणाची गंभीरता बघत पोलिसांना चौकशीचे आदेश देत, चौकशी पूर्ण झाल्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते केले आहे, लवकरच या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असणार अशी हमी गृहमंत्री वळसे पाटील यांनी शरद पवार विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. Investors fraud
आर्थिक गुन्हे शाखे मार्फत पीडित गुंतवणूकदारांचे बयाण नोंदविणे सुरू आहे.
शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी सदर प्रकरणाची तात्काळ गंभीरता घेतल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. Sharad pawar vichar manch
