News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदा येथील कु.गायत्री सूर्यभान उरकुडे या मुलीने देहरादून येथे आयोजित मिस्टर अँड मिस D.C.इंडिया 2022 चा पुरस्कार मिळविला आहे.या स्पर्धेत देशाच्या विविध शहरातील एकूण 40 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
यामध्ये गायत्रीला मिस महाराष्ट्र D.C. इंडिया 2022 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.स्पर्धेचे आयोजन अभिनेते व डिझाईनर सुफी साबरी यांनी केले.तर हरियाणातील अभिनेता कुलदीप कौशिक यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.गायत्रीने आपल्या गुरू फॅशन कोरियोग्राफर इमरान शेख आणि मिस D.C.इंडिया 2019 च्या पायल शाहू यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथे वन डायरेक्शन मॉडेलिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले.पुरस्कार मिळाल्या बद्दल गायत्रीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
