चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा युवक कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष 33 वर्षीय हरीश कोत्तावर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. Congress news
कोत्तावार मागील 4 वर्षांपासून चंद्रपूर लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला 4 वर्षाचा कार्यकाळही उत्तम रित्या पूर्ण केला होता.
त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात युवक कांग्रेस मध्ये युवकांचं चांगली संघटनात्मक बांधणी केली, मात्र त्यांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले.
नुकतंच त्यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस ही साजरा केला होता.
कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला होता, त्यांच्या निधनाने कांग्रेस पक्षाला खूप मोठी हानी पोहचली आहे.
