News 34 ghughus
घुग्गस : शहरातील सर्वात मोठी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडणुकीसाठी राजीव रतन चौकात असलेल्या रेल्वे गेट वर आर.के. गोधानी कंपनी तर्फे उड्डाण पुलाचे कार्य सुरू करण्यात आले असून चंद्रपूर - यवतमाळ - पुणे हा राज्य महामार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने पुलाचे कार्य सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक होते.
मात्र पुल निर्माण करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजी व ढिसाळ व्यवस्थापनाने हा मार्ग अपघाताचा हॉट स्पॉट ठरला आहे. Accident hotspot
यामुळे संतप्त काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी सहकार्या सह कंपनीचे कार्यालय गाठून कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
या मार्गावरील अपघात ग्रस्त नागरिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी चोवीस तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करा वाहतूक नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकाची संख्या वाढवा.
Congress news
खोद कामातून निघणारी वेस्ट मटेरियल उदा. माती सिमेंट क्रोंकिट व इतर साहित्यांचा वापर घुग्गुस महाताररदेवी रोडवरील खड्डे बुजिण्यासाठी करावा तसेच उर्वरित वेस्ट मटेरियल शहरातील सामाजिक अथवा धार्मिक परिसरातील दुरुस्ती करिता करावा तसेच रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी स्वच्छता कामगारांची नियुक्ती करावी.
रस्त्यावर वॉटर टँकरने पाण्याचा छीळकाव करावा व या मागण्या आठ दिवसात सोडवा अन्यथा कंपनीचा काम बंदचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे
Water Tanker
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,रोशन दंतलवार, नुरुल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी, रोहित डाकुर, रफिक शेख, बालकिशन कुलसंगे,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे, सुनील पाटील,कपिल गोगला,प्रदीप आसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
