News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणचे निवृत्त कर्मचारी पांडुरंग सोनटक्के यांचे चिरंजीव कुणाल सोनटक्के यांनी त्यांच्याद्वारे महावितरण च्या अधिकारी व कर्मचारी यांना केलेल्या तत्पर मदतीची दाखल घेत, मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी नुकताच सत्कार केला. कुणाल सोनटक्के हे मेडी- असीस्ट कंपनी या इन्शुरन्स कंपनीचे चंद्रपूर परिमंडळाचे जिल्हा समन्वयक आहेत. Msedcl
महावितरण मध्ये काम करतांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ना डोळ्यांनी न दिसणाऱ्या, लोकांच्या जीवनात प्रकाश, आनंद, सुविधा पोहोचवीणाऱ्या पण तितक्याचं घातक असणाऱ्या विजेचा सामना करीत असतात. अशावेळी चुकून अपघात झाला तर त्यांची आर्थिक काळजी घेण्यास महावितरणणे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीशी करार केला आहे. कर्मचाऱ्यांना कॅशलेस cashless किंवा आजारानंतर आलेल्या खर्चाचा भरणा होण्यास ही कंपनी त्यांच्या मेडिकल कागदपत्रांच्या साहाय्याने आर्थिक खर्चाची प्रतीपूर्ती करण्यास मदत करते. जिल्हा समन्वयक म्हणून कुणाल सोनटक्के गरजवनतांच्या हाकेला नेहमी धावून जातात. नुकेतच महावितरणच्या कला, कामगार व क्रीडा मंडळाच्या समन्व्ययात महावितरणच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी साई डिव्हाईन केअर हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली, ती पार पाडण्यात कुणाल सोनटक्के यांनी आरोग्य शिबीर आयोजित करण्यापासून ते पूर्ण पार पडेपर्यंत कुणाल सोनटक्के यांनी त्यांच्याद्वारे महावितरण च्या अधिकारी व कर्मचारी यांना केलेल्या तत्पर मदतीची दाखल घेत, मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी नुकताच सत्कार केला.
