राजुरा - 29 एप्रिलला राजुरा पोलीस विभागातील वाहनचालक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या रायटरला 50 हजारांची लाच स्वीकारताना नागपूर लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केल्याने पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली होती.
पोलीस विभागातील रायटर राजेश त्रिलोकवार व वाहनचालक सुधांशु मडावी यांनी राजुऱ्यातील दारू व्यावसायिकाला 50 हजार रुपये मागितले होते, पैसे देण्याची इच्छा नसल्याने दारू व्यावसायिकाने यासंदर्भात नागपुर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. Acb Trap
Chandrapur police
लाचलुचपत विभागाने सापळा रचत पोलीस स्टेशनसमोर दारू व्यावसायिकांकडून 50 हजार रुपये घेत असताना दोघांना रंगेहात अटक केली, त्यांची झाडाझडती घेतली असता दुचाकी वाहनातून 2 लाख 60 हजार रोख व कुणातर्फे किती पैसे घ्यायचे आहे त्याची यादी लाचलुचपत विभागाला मिळाली.
दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस सुरू असताना राजेश नी तिथून पळ काढत तलावात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
विचारपूस झाल्यावर दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केले असता दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Acb trap
सदर प्रकरणात 3 दिवस उलटल्यावर सुद्धा नागपूर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रेस नोट सुद्धा काढली नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते.
सदर वसुली कुणाच्या सांगण्यावरून करीत होते याबाबत मात्र अधिकृतपणे माहिती मिळाली नाही.
