News 34 chandrapur
गडचांदूर :-
गडचांदूर येथील जनतेच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात 13 एप्रिल रोजी येथील नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
येत्या 10 दिवसात यातील बहुतेक मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असे प्रशासकीय अधिकार्यांनी त्यावेळी म्हटले होते.काही मागण्या पूर्ण सुद्धा करण्यात आल्या परंतू यातील दोन महत्वाच्या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाही.थकबाकी गृहकर व पाणीपट्टी करावर लावण्यात आलेल्या 2 टक्के दंड (व्याज)रद्द करणे,पंतप्रधान आवास योजनेची उर्वरीत रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करणे,या मागण्या संदर्भात काहिच सकारात्मक विचार करण्यात आलेला नाही. आगोदरच कोरोनामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.असे असताना नगरपरिषदेने लावलेला दोन टक्के व्याज भरायचा कसा ? हाच मोठा प्रश्न ! या दोन्ही मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखेर गडचांदूर भारतीय जनता पार्टीतर्फे 18 मे रोजी नगरपरिषदे समोर ठिय्या आंदोलन करण्यात आला तर 19 मे पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही,तोर्यंत उपोषण मागे घेणार नाही,असा निर्धार गडचांदूर भाजपा दलित आघाडी अध्यक्ष प्रशांत खाडे व शक्ती केंद्र प्रभारी बब्लू रासेकर या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जर यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर यापेक्षाही मोठा व तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक अरविंद डोहे व भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी दिला आहे.
सदर एकदिवसीय ठिय्या आंदोलनात शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,उपोषणकर्ते प्रशांत खाडे,बब्लू रासेकर,अरविंद कोरे,राकेश अरोरा, सत्यदेव शर्मा, कुणाल पारखी,सुयोग कोंगरे, बंटी गुरनुले, हरी कुसले,अशोक दरेकर, विवेक खैरे, गणपत तुरानकार,विनाबाई खंडाळकर,लताबाई खैरे, इंदिरा बोरकर,अनिता पंचकुटी,सुनंदा गिलबिले, रमाकांत काळे,शिवा सिडाम,अनिल सिडाम, शुद्धोधन खैरे,गुलाब जिवने इत्यादींची प्रमुखाने उपस्थिती होती. आता नगरपरिषद शासनप्रशासन याविषयी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
