News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल - नुकतेच मुल शहरातील स्मशानभूमीत, नवभारत शाळेजवळ मधमाशानि परिसरात वावरणाऱ्या जनतेवर चावा घेत जखमी केल्याच्या घटना घडल्या.
त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुल नगर परिषद चे माजी बांधकाम सभापती तथा सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असणारे प्रशांत समर्थ यांनी नगर प्रशासनाची भेट घेत पाठपुरावा सुरू केला, स्वतः संबंधित अधिकारी, कर्मचार्यांकडे बसून या संबंधी काम करणाऱ्या बाहेरून आलेल्या चमू सोबत स्वतः उपस्थित राहत एकूण सोळा ठिकाणचे मधमाशांचे पोळे काढून घेतले, स्मशानभूमी, उमा नदीवरील पुल, नवभारत शाळा परिसर, प्रशासनिक कार्यालय या परिसरातील पोळे केमिकेल च्या सहायाने काढण्यात आले आहे. त्यामुळे सदर जागेवर कींवा आजूबाजूला मधमाश्या पुन्हां बसत नाही अशी माहिती आहे, माजी सभापती प्रशांत समर्थ यांनी जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. Beehive
संपूर्ण निकाल येईपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या, सदर चमू सोबत स्वतः जात सर्व ठिकाणचे पोळे काढवुन घेत जनतेतील भीती दूर केल्याने जनतेने पण प्रशांत समर्थ यांचे आभार मानले आहे.

