News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपनाच्या दिशेने गडचांदूरकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसच्या जबर धडकेत सोनुर्ली येथील एका 23 वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 17 मे रोजी सकाळी अंदाजे 11 च्या सुमारास गडचांदूर शहराच्या बाहेर घडली. निखील बंडु पत्रकार असे युवकाचे नाव असून तो गडचांदूर वरून त्याच्या स्वगावी सोनुर्लीकडे जात असल्याची माहिती आहे.तो गडचांदूर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका दुकानात काम करत होता.सदर युवक भरधाव वेगाने एका मोडीवर ओवरटेक करत असताना ही दुर्घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळत होती.अचानकपणे बसची धडक बसल्याने निखील जागीच कोसळला.
Accident
Accident
त्याच्या डोक्यातून होत असलेला रक्तस्त्राव पाहता बस चालक,वाहक व नागरिकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.मात्र उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती कळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाईला सुरूवात केली.
हल्ली राजूरा,गोविंदपूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र असून मागील आठवड्यात याच मार्गावरील खिर्डी जवळ दोन मित्रांचा पहाटेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला तर दोन दिवसापुर्वी सोनुर्ली जवळ दुचाकीस्वार एका तरूण महिला प्राध्यापिकेचा कारच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.16 मे रोजी रात्री अंदाजे 12 च्या सुमारास अंबुजा फाटा येथे गडचांदूर येथील दोन तरूणांचा कारने अपघात झाला.दोघेही सध्या चंद्रपूर येथे एका दवाखान्यात उपचार घेत असल्याचे कळते.एकुणच या मार्गावर दररोज लहानमोठे अपघातांची मालिका सतत सुरू असून यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा नाहक बळी जात आहे.यावर अंकुश लावण्यासाठी पोलीसांमार्फत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे सोबतच सुसाट,वेगवान,बेशिस्त,भरधाव लहानमोठ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत यूक्त मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली असून यासंदर्भात निवेदन देणार असल्याचे कळते.मात्र यापूर्वी पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
