News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - महात्मा फुलेंच्या विचाररानेच देशाची लोकशाही टिकली आहे. तसेच बहुजन समाज सुधारणेसाठी देखील महात्मा फुलेंचे विचारच खरे प्रेरणादायी आहेत असे अमूल्य विचार आपल्या प्रस्ताविकामधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद (पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समता परिषदेच्या कार्याध्यक्ष जेष्ठ कवयित्री शशिकला गावतुरे तर प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक मनोहर राजूरवार, जी.प.शिक्षिका कविता संगोजवार, तालुका पत्रकार संघाचे सचिव गंगाधर कुणघडकर, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा जेष्ठ पत्रकार गुरु गुरनुले ,प्राचार्य डाँ.कऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी कविता संगोजवार यांनी आपल्या स्वरचित सुरेख कविता व गीतामधून फुले दाम्पत्याचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला.श्री.कुणघडकर यांनीही फुलेंची संघर्षमय वाटचाली विषयी मार्गदर्शन केले. तर माळी महासंघाचे महासचिव गुरु गुरनुले यांनी तत्कालीन काळात महात्मा फुले उद्योजक असल्याने आर्थिक सम्पन्नता होती म्हणून त्यांना संघर्ष करता आला करिता उपस्थित महिलांनी लहान उद्योग उभारुन समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आव्हान याप्रसंगी केले. सभाध्यक्षा शशिकला गावतुरे यांनीही कविता वाचन केल्या. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रबोधनामधून विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉक्टर राम दांडेकर, नामदेवराव गावतुरे, युवराज चावरे,देवराव ढवस, प्रा. प्रभाकर धोटे प्रा. गुलाब मोरे परशुराम शेंडे, दिलीप मोहुलें, किरण खोबरागडे, सुरेश संगोजवार, विनोद आंबटकर,दुषांत महाडोळे, सौ सीमाताई लोनबले, शारदाताई शेंडे, नीलिमा गुरनुले, किरण चौधरी, माधुरी गुरनुले, अर्चना चावरे, जया ढवस, विद्या कुनघाडकर,छाया गावतुरे, दर्शना निकुरे, अर्चना लेनगुरे, जयश्री निकुरे, मयुरी लोनबले, कल्पना लेनगुरे श्वेता वाढई शालू गुरनुले रूपाली वाढई अश्विनी गुरनुले ज्योती सोनुले रेखा शेंडे तसेच तसेच युवक युवती बालक समाज बांधव उपस्थित होते. संचालन प्रा. पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी केले तर आभार ओमदेव मोहुलेंं यांनी मानले.
