News 34 chandrapur
गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात आठवडा पासून धुमाकूळ घालत असलेला वाघ आजही गावालगतच्या झुडपात असल्याची माहिती मिळताच लोक वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत असताना चवताळलेल्या वाघाने जमावावर हल्ला चढविला. यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी तोहोगाव येथे घडली.
सुदैवाने जीव हानी झाली नाही. या वाघाच्या हल्ल्यात राजुरा तालुक्यातील
सुदैवाने जीव हानी झाली नाही. या वाघाच्या हल्ल्यात राजुरा तालुक्यातील
विरूर स्टेशन येथील सुरेश मत्ते व तोहोगाव येथील शरद बोपणवार हे दोघे नागरिक जखमी झाले आहेत. परंतु या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असुन तात्काळ वाघाला जेरबंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वनविभागाला जनतेनी दिला आहे.chandrapur tiger attack
मागील आठवड्यापासून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, आर्वी, वेजगाव परिसरात वाघाने गावालगतच धुमाकूळ घातला असून पाच बैल, शेळ्या, म्हैस या पाळीव प्राण्याना ठार केले आहे. यामुळे जनतेत वाघाची दहशत असल्याने नागरिक रात्रं दिवस जागून काढीत आहे. पोलीस व वनकर्मचारीही संयुक्त गस्त करीत आहेत. परंतु वन विभागाने वाघाला जेरबंद करण्याची मोहीम गंभीरपणे घेतलेली नाही. केवळ देखावा म्हणून एक पिंजरा आणि काही मोजके ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. दरम्यान आज अकरा वाजेच्या सुमारास तोहोगाव - आर्वी मार्गातील नाल्यालगतच्या झुडपात वाघ लपून बसल्याची वार्ता परिसरात पसरली. यामुळे वाघाला पिटाळण्यासाठी व काही पाहण्यासाठी त्यास्थळी गेले. यावेळी वन कर्मचारी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु लोक वाघाला हुसकावून लावण्यासाठी दगड मारू लागले आणि वाघ चवताळला व लोकांचे दिशेने हल्ला चढवीला. यामूळे लोकांची धावाधाव झाली. यात वाघाने हल्ला करून तोहोगाव येथील शरद बोपणवार, विरुर स्टेशन येथील सुरेश मत्ते यांना गंभीर जखमी केले. जखमींना तात्काळ तोहोगाव आरोग्य केंद्रात भरती केले आहे. या घटनेनंतर जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून तात्काळ वाघाला जेरबंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वेजगाव येथील माजी सरपंच नरेंद्र वाघाडे, तोहोगाव येथील माजी उपसरपंच फिरोज पठाण आणि जनतेनी दिला आहे. Wild animals
घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक स्वेता बोड्डू घटनास्थळी पोहचले. येथे आणखी पिंजरे लावण्यात येत असून नागपूर व चंद्रपूर येथील विशेष पथक लवकरच येऊन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
