News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणला आज सकाळी ७००- ८०० मे.वॅ. वीज उपलब्ध झाल्याने राज्यात सकाळी ७.३० ते १०.०० पर्यंत कोठेही भारनियमन करण्यात आले नाही यामुळे महावितरणच्या सर्व ग्राहकांना दिलासा मिळाला.
Mahagenco सोबतच राज्यभरात डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अखंडित वीजपुरवठा मिळाला.
आज सकाळची विजेची मागणी २२५०० मे.वॅ. पर्यंत होती, त्याचा यशस्वी पुरवठा करण्यात आला. Load shedding ग्राहकांना अखंड विजपुरवठा होण्यास महावितरण शर्थीचे प्रयत्न करीत असून ग्राहकांनीही या अशा संकट काळी आपल्या महावितरण कंपनीला सहकार्य करावे. शक्य व जमेल तसे काटकसरीने वीज वापरावी. सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 10 या कालावधीत वीज बचत करावी अशी विनंती करण्यात येत आहे. War room monitoring
आज संध्याकाळी ही जास्तीत जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणाची तयारी असून NTPC कडून ५५० मे.वॅ. वीज शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहे.
यासंदर्भात, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूमची स्थापना करण्यात येत असून त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील वीज वितरणावर याच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवले जाईल तसेच ग्राहकांच्या अडचणी सोडवल्या जातील व त्यांना सद्य स्थितीची योग्य ती माहिती दिली जाईल. चंद्रपूर परिमंडळात ही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असून या दोन्ही जिल्ह्यासाठी वार रूम ची स्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी वार रूम चे क्रमांक आहे. 7875761195
**********************
तसेच, गडचिरोली जिल्ह्यासाठी वार रूम चे क्रमांक आहे. 7875009338
मुख्यालयातही अशीच वॉर रूम स्थापन करण्यात आली असून राज्याच्या भार व्यवस्थापनाचे नियोजन व नियंत्रण येथून केले जात आहे.
या सर्व वॉर रूमचे प्रमुख अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी राहतील.
संपूर्ण स्थितीवर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे यांचे बारकाईने लक्ष ठेवून असून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल यांचे धाडसी नियोजनातून हे शक्य झाले आहे.
(सर्व आकडेवारी – रियल टाईम असून याच्यात बदल होऊ शकतो.)
