News 34 Chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
औद्योगिक शहर गडचांदूर येथील अगदी वर्दळीच्या पेट्रोल पंप चौकापासून माणिकगड सिमेंट कंपनी गेटपर्यंतचा रस्ता cement काँक्रिटीकरणासाठी मागील अंदाजे 1 वर्षापूर्वी संपूर्णपणे खोदण्यात आला होता. मात्र अचानकपणे हे काम बंद पडले.
अंदाजे 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लोटूनही कामाला सुरूवात न झाल्याने येथील काही राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सुज्ज्ञ नागरिकांनी संबंधित विभाग,लोकप्रतिनिधींना यासंदर्भात तक्रारी दिल्या, आंदोलने झाली.मात्र कोणीही याकडे लक्ष देत नव्हते. दरम्यान जनतेची गैरसोय व जीवघेणा त्रास लक्षात घेता माजी आमदार अॕड.संजय धोटे यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. निधी असून,पैसे असूनही काम का रखडले ? यासंदर्भात विविध प्रकारचे आरोप करत जर येत्या 15 दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरूवात करून पुर्ण न केल्यास आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्याने शासनप्रशासन खडबडून जागे झाले आणि तडकाफडकी अवघ्या 3 दिवसातच सदर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. सध्या परिस्थितीत याठिकाणी एकेरी रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून दुसरी बाजू अजूनही जैसेथे परिस्थितीत आहे.आता पुन्हा यासाठी आंदोलनाची गरज पडणार की काय अशी शंका जनमाणसातून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी सुद्धा लगेच(माजी आमदार अॕड.संजय धोटे पाठोपाठ) राजूरा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.रस्त्यांची कामे तात्काळ करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही काही ठिकाणी दिरंगाई होत आहे.स्थानिक नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची वेळ येत असून ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली त्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर अशा कंत्राटदारांकडून कामे काढून दुसर्याला देऊन पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिला होता ! आश्चर्याची बाब म्हणजे सदर रसत्याचे काम मागील एक वर्षापासून खितपत पडले असताना याठिकाणी अपघात घडले, काहींना जीवही गमवावा लागला,पावसाळ्यात चिखल, summer व हिवाळ्यात धुळीमुळे नगरिक त्रस्त होते. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी याकडे लक्ष दिले नाही आणि आता माजी आमदारांनी केलेले जळजळीत आरोप व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर यांनी चक्क उपोषणाचा इशाराच दिला आहे.अशी चर्चा त्यावेळी ऐकायला मिळाली.आता कोणाच्या इशाऱ्याने व कोणाच्या आंदोलनाने काम सुरू झाले हा मात्र संशोधनाचा विषय असून लवकरात लवकर या रस्त्याची दुसरी बाजूही सिमेंटीकरण करून जनतेसाठी खुली करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
----------//--------