News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही गुढीपाडवाच्या दिवशी आकाशातून विशालकाय रिंग सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेले लाडबोरी गावात पडल्याने एकच खळबळ उडाली ते अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती आहे परंतु अजूनही खात्रीलायक माहिती मिळाली नाही.
(Fireballs in the sky)
काल रविवारी सकाळी सुद्धा सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जवळ पवन पार टेकरी तलावाजवळ गोल आकाराचा अवशेष तेथील गावकरी नागरिकांना मिळाला.
व सोमवार ला दुपारी ३-३० वाजता तालुक्यातील असलेल्या अस्वला मेंढा तलावा जवळ गोळा मच्छीमार (Fisherman) ला मिळाला व काल सकाळी पवनपार तसेच मरेगाव ला मिळाला होता आज सोमवार ला सकाळी गुंजेवाही कोटा येथे पुन्हा एक गोलाकार चेंडू आकाराचा सिलेंडर मिळाले आहे. ते याप्रमाणे, (Meteor showers april 2022)
१) काल पवनपार, येथे धातुचा गोळा मिळाला २)काल मरेगाव येथील जंगलात धातुचा गोळा मिळाला, ३) आज गुंजेवाही कोठा मध्ये धातुचा गोळा मिळाला.
४) दुपारी 4 वाजता सुमारास असोला मेंढा तलावा अगदी काठावर मच्छीमार ला धातुचा गोळा मिळाला असुन हे पवनपार तसेच मरेगाव,गुंजेवाही कोटा,व अस्वला मेंढा तलावाच्या गावाजवळील नागरिकांनी धातुचे गोळे तलाठी अक्षय झाडे व तलाठी पंकज नागपुरे यांना सांगुन तालुक्यातील प्रशासनाला आणुन दिले. व सिंदेवाही पोलीस ठाण्यात ही काल रविवारी ला २ गोळे जमा करण्यात आले आहे. व आज सोमवार ला २ गोळे जमा करण्यात आले. हे गोळे सारखेच असल्याची माहिती आताच सिंदेवाही तहसीलदार जगदाळे यांचेकडून मिळाली आहे.
सिंदेवाही तालुक्यात मिळालेल्या एकूण गोळ्यांची संख्या ४ व १ रिंग आहे.
