ब्रह्मपुरी - नक्षलग्रस्त भागातील मत्स्यव्यवसाय विभागातील सहायक विकास अधिकारी यांनी अनुज्ञेय वेतन श्रेणीच्या वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी असा अर्ज मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी येथे अर्ज केला मात्र वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय वर्षा मगरे यांनी तक्रार दाराला 4 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली, पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सदर बाब लाचलुचपत विभागाकडे केली. Chandrapur acb
लाचेची 4 हजार 500 रुपयांची रक्कम तडजोडीअंती 4 हजारावर आली, तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत 4 हजार रुपये घेताना मगरे यांना रंगेहात पकडत गुन्हा नोंद केला.
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नक्षल भत्त्याच्या स्वरूपात वाढीव वेतन मिळत असते त्या अनुषंगाने तक्रारदाराने वेतनश्रेणी व वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्याकरिता अर्ज केला मात्र वरिष्ठ लिपिक यांनी सदर कामासाठी पैश्याची मागणी केली. Bribe
तक्रारीची दखल घेत ब्रह्मपुरी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली. Department of Fisheries
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, रोशन चांदेकर, नरेश ननावरे, वैभव गाडगे, मेघा मोहूर्ले व विकास काशीयवाले यांनी केली.
