News 34 chandrapur
राजुरा - राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे हिश्याला जास्त शेतजमीन यावी, या लोभापायी सावत्र भावांनी कट रचून सावत्र आई व भावाला जिवंत संपविण्यासाठी कट रचुन धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सावत्र आई गंभीर जखमी झाली असून तिचा मुलगा प्रसंगावधान राखून पळून गेल्याने सुदैवाने वाचला. Crime news
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथे रतन दाऊ ताकसांडे यांचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यांना वीस एकर शेतजमीन व घर आहे. दाऊ ताकसांडे यांना दोन पत्नी असुन पहील्या पत्नीला तीन मुले व दुसऱ्या पत्नीला एक मुलगा आहे. दुसरी पत्नी आपल्या मुलासह तेलंगाणा राज्यात राहते. मात्र शेतीच्या वाटपावरुन या कुटूंबात पुर्वीपासुनच वाद सुरु होता. दुसरी पत्नी लक्ष्मी रतन ताकसांडे, वय 48 व मुलगा व्यंकटेश ताकसांडे हे डोंगरगावला आले. या दरम्यान सावत्र भावाने आई व भावाला जिवे मारण्याचा कट रचला. attempt to murder
सकाळी 9 वाजताच्या सुमारास फराळाच्या निमित्याने सावत्र मायलेकांना आपल्या घरी बोलावुन शेत जमीनीचा वाद घातला आणि धारदार शस्त्राने मुलावर वार करण्याचा पयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखून व्यंकटेश बाहेर पळून गेला. मात्र या भावांनी सावत्र आईला बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने मानेवर व चेहऱ्यावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. ही महिला घराच्या बाहेर जखमी अवस्थेत असताना आणि मदतीची याचना करीत असताना आरोपींच्या हातात शस्त्र पाहून कुणीही मध्ये आले नाही. Child assault on mother
अखेर विरूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमी महिलेला दवाखान्यात हलविले. याप्रकरणी आरोपी दीपक ताकसांडे, वय 35 व फुलवंत ताकसांडे, वय 38 या दोघांना अटक केली. आरोपी विरुद्ध भादंवी कलम 307, 504, 506, 34 व शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 25,4अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विरुर ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली भुजंग कुळसंगे, सचिन खेरे, मडावी नरगेवार , सूर्यभान मार्कडे, विजय मुंडे करीत आहे.