चंद्रपूर / मुंबई - राज्यातील मुदत संपलेल्या (Maharashtra Local Body Election) महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या 17 जून ते 11 जुलै या कालावधीत या निवडणूक घेणे शक्य असल्याचे राज्य निवडणूक आयाेगाने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. या प्रकरणी आता 4 मे राेजी सुनावणी हाेणार आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 106 नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या आहेत. तसेच मुदत संपलेल्या व आगामी काळात मुदत संपणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेचीही तयारी पूर्ण केली आहे व काहींची तयारी प्रगतीपथावर आहे. शपथपत्रात पुढे म्हटले आहे की, राज्यात 3 मार्च 2022 राेजी 2 हजार 155 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या असून 31 डिसेंबर 2022 पर्यंत 9 हजार 963 संस्थांची मुदत संपेल.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही ओबीसी आरक्षण राहणार काय हा मोठा प्रश्न आहे, सध्यातरी ह्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे चित्र आहे.
तत्काळ प्रक्रिया सुरू केल्यास मनपा निवडणुका १७ जून, नगर पालिका निवडणुका २२ जून, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ११ जुलै, आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका २ जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
आयोगाने थेट वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने आता लवकरच निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने दिलेल्या तारखांवर आक्षेप घेत सदर तारीख ही पावसाळ्यात येत असून त्यावेळी वादळी वारा व पाऊस सुरू असल्याने त्यावेळी निवडणूक घेता येणार नाही.
आता या सर्व विषयावर 4 मे ला सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार असून त्यावेळी निवडणुका जाहीर होणार की पावसाळा जाण्याची वाट बघावी लागणार जे कळेलचं.
