News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यासह विदर्भात तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कलकाम रिअल इन्फ्रा (इं) लि. या कंपनीच्या संचालकांवर व त्यांना साथ देणाऱ्यावर एम.पी.आय.डी. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये त्यांना मिळवून द्यावे अशी मागणी कलकाम कंपनीच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून कलकाम कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदार असलेल्या रत्नमाला संजय चहारे, मंगला सुनिल लोणारे यांनी केली आहे. Fraud case
नागरिकांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून कलकाम कंपनीने आपले पाय चंद्रपुरात पसरविले मात्र रिझर्व्ह बँकेची परवानगी व आपण या फसवेगिरी प्रकरणातील कायदेशीर कंपनी चालवीत आहो असा भास कंपनीने गुंतवनूकदारांना दिला. Kalkam company
कमिशनाच्या लोभापायी कलकाम कंपनीत काम करणाऱ्या एजंटनी नागरिकांची विश्वासार्हता प्राप्त करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली, आणि ज्यावेळी गुंतवणुकीच्या रकमेचा कालावधी संपला त्यावेळी कलकाम कंपनीने राजकीय बळाचा वापर करीत गुंतवणूकदारांना हाकलून लावले.
Investor fraud
सन 2013 पासुन कलकाम रिअल इस्टेट कंपनी मध्ये नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु 2019 नंतर ठरलेल्या मुदतीत रक्कम देण्यास विष्णू पांडूरंग दळवी, सि.एम.डी. कलकाम रिअल इन्फा (इं) लि. विष्णू दळवी, डेव्हलपमेंट डायरेक्टर विजय सुपेकर, सुनिल वांद्रे,अनिल पासवान, महमद इदरीस, विजय वासुदेव येरगुडे,विदेश प्रभाकर रामटेके, किसन मोतीराम पेंदोर यांनी टाळाटाळ केली. गुंतवणूकदारांनी विदर्भ प्रभारी विजय वासुदेव येरगुडे व विदेश प्रभाकर रामटेके यांच्याशी संपर्क साधून पैशाची मागणी केली असता वेळोवेळी त्यांनी मनसेच्या भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांना बोलावून गुंतवणूकदारावर दबाव टाकण्याचा व गुंतवणूकदारांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे.असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्या संदर्भात गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत मनसे पदाधिकारी हे कलकाम कंपनीची बाजू घेत असणारा व्हिडीओ दाखविला आहे.
अश्या फसवेगिरीत बोगस कंपन्यांना राजकीय पाठबळ देण्याचे काम मनसे पक्षाच्या वतीने 2 पदाधिकाऱ्यांनी केले मात्र त्या फसवेगिरी करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूक दारांची बाजू सुद्धा मनसे पदाधिकारी राजू कुकडे यांनी केल्याने चंद्रपुरात आता फसवेगिरी कंपनीत "मनसे वाद" निर्माण झाला आहे.
एकीकडे पक्षाला वाढविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाला उभारी देण्याचे काम करीत आहे मात्र दुसरीकडे त्यांचे पदाधिकारी अश्या फसवेगिरी कलकाम प्रकरणी सहभाग घेत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सदर प्रकरणी लक्ष देणार की नाही? पक्षाला नवी भरारी मिळावी यासाठी मनसेचे डॅशिंग नेते अविनाश जाधव चंद्रपुरात दाखल झाले होते मात्र त्यानंतर सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनातच राहिला. Mns adhikrut
एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा.
गुंतवणूकदार पैशाचा तगादा लावत असल्याने एजंट गणेश कविटकर व रतन रामटेके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यु झाला व अनेक ठेवीदारांचे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाले. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर, नंदू घाडी, संजय जाधव, कुणाल सूर्यवंशी, सुधीर खापने यांची भेट गुंतवणूकदारांनीं घेतली. Raj thackeray
पण संचालक समोर आले नाही. मुंबई पोलीसांनी चंद्रपूर जिल्ह्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कलकाम कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने रत्नमाला संजय चहारे, व मंगला सुनिल लोणारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे तक्रार केली. असून हे प्रकरण गडचांदूर पोलीस स्टेशन मधे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एम.पी.आय.डी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील सर्व गुंतवणूकदार हे आमरण उपोषण करेल असा इशारा गुंतवणूकदारांनी पत्रकारपरिषद घेऊन पोलीस प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह कलकाम कंपनीचे एजंट रत्नमाला चहारे, मंगला लोनारे, पायल तेलंग, रत्नमाला गायकवाड, विनोद काळे, छत्रपाल निषाद, सचिन नाकाडे, रवी सोरते, संदीप पन्दरे, मेघाराणी संगीता गोरडवार विलास घोटकर, प्रतिभा गौरकर, उत्तम उपरे इत्यादींची उपस्थिती होती.
अनेकांचे पैसे मिळवून दिले, ते आरोप खोटे
आम्ही धमकी कोणत्याही गुंतवणूकदाराला दिली नाही. आमच्या प्रयत्नामूळे अनेकांचे पैसे परत मिळाले.आणि ही प्रक्रिया सुरू आहे.लोकांना न्याय देण्यासाठी मुंबई गाठले.राज ठाकरे यांची भेट घेतली.त्या नंतर या विषयाला वाचा फुटली.परंतू आता आरोप केले जात असतील तर ते योग्य नाही.
प्रतिमा ठाकुर मनसे नेत्या चंद्रपूर
