मुंबई - एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तब्बल 6 महिने लढा दिला मात्र महाविकास आघाडी सरकारने विलीनीकरणाला नकार देत कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठेंगा दाखविला. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. St employee bank
आता एसटी बँकेची निवडणूक घोषित झाली आहे, मात्र जे थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.
याचा फायदा शकुनी काकां घेत असून त्या आड एसटी बँकेची 2 हजार कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न ते आखत आहे. Gopichand padalkar
ज्या कर्मचाऱ्यांनी बिन पगारी विलीनीकरणासाठी लढा दिला ते सर्व त्या बँकेचे थकबाकीदार बनले आता मतदानापासूनही त्यांना वंचित ठेवण्यात आले.
St employee strike
1995 इंटक शी हातमिळवणी करीत शरद पवारांनी आपल्या एकमेव एसटी संघटनेला मान्यताप्राप्त करून घेतली. Sharad pawar
संघटनेच्या सभासद फी च्या नावाखाली कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले, वार्षिक 500 रुपये, वाढदिवसाला मनसोक्त रुपये जमा करण्यात आले, या माध्यमातून तब्बल 100 कोटी रुपये कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात आले. Mahavikas aghadi government
त्या पैश्यांच्या माध्यमातून पवारांनी आपल्या बगल बच्चयाना 20 लाखांचे वाहन खरेदी करून दिले.
मात्र एसटी महामंडळ विलीनीकरणासाठी केलेल्या आंदोलनात उपाशी पोटी कर्मचाऱ्यांनी लढा दिला पण त्यावेळी एसटी कामगारांच्या त्या एकमेव संघटनेने त्यांना एकवेळच जेवण ही दिले नाही. Silver oak
सिल्व्हर ओकवरून साधा चहा ही देण्यात आला नाही हीच कर्मचाऱ्यांप्रति तुमची माणुसकी आहे काय? असा प्रश्न आमदार पडळकरांनी उपस्थित केला आहे.
संघटनेत माणुसकी असती तर त्यांनी 135 विधवा विधवा भगिनींना आर्थिक मदत केली असती.
आम्ही अश्या मुघलाई प्रवृत्तींना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही यासाठी आम्ही कायदेशीर लढा देण्यासही तयार आहो असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
