News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक 28/4/2022 ला दुपारी 3.30 वाजता चिचपल्ली रेंज मधील उथळपेठ या गावातील वामन कीन्नाके यांच्या भाजीपाल्याचा वाडीत बीबट चा पील्लु असल्याची माहीती गावक-यांनी वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्था, मूलच्या सदस्यांना दीली. माहीती मिळताच वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी त्वरीत पोहोचले.त्याठीकाणी गावक-यांची मोठी गर्दी जमलेली होती. चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रीयंका वेलमे यांचे मार्गदर्शनात संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी जवळपास साडेतीन महीन्याचा बीबटच्या पील्ल्याला सुरक्षीतपणे पकडले व त्वरीत त्याला टी.टी.सी. चंद्रपुरला पाठवन्यात आले. Leopard cube
सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक पी.डी खनके, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, स्वप्नील आक्केवार, वनरक्षक पी.एस. मानकर, शीतल चौधरी व वनमजुर उपस्थीत होते...
