News 34 chandrapur
गोंडपीपरी - गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील युवा शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळत आत्महत्या केली. सदर घटना ही 24 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्याग्रस्त युवकाचे नाव संतोष वामन डोंगरे 41 असे आहे.
Farmer suicide
Farmer suicide
सततची नापिकी व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामुळे तो विवंचनेत होता. मृतक संतोष हा स्वतः च्या शेतातील आसलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, भाऊ आणि आई असा बराच मोठा आप्त परिवार आहे. संतोषच्या अवेळी जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. indebtedness
