News 34 chandrapur
भद्रावती - राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या व्यवस्थापकाला धमकी दिल्याप्रकरणी खासदार धानोरकर यांचेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. Mp balu dhanorkarराजकारणात पदाचा पॉवर मिळाला की राजकीय नेते हे हवेत असतात, आपले राजकीय क्षेत्रात आपलाच दबदबा अशी समज त्यांना असते, आपण आपल्या क्षेत्राचे राजे आहोत असा गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होतो. complaint against MP Dhanorkar
देशात आजही कायद्याचे राज्य आहे हे जनप्रतिनिधी नेहमी विसरतात.
22 मे 2022 ला विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक असल्याने सध्या सर्व कार्यभार निवडणूक अधिकारी सांभाळत आहे.
18 एप्रिल पासून नामनिर्देशन स्वीकारण्याचे काम सुरू झाले आहे, अश्यातच खासदार धानोरकर 19 एप्रिलला त्या सहकारी संस्थेत पोहचत व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांना सम्पर्क साधत सहकारी संस्थेत बोलाविले. Police complaint
व्यवस्थापक गोविंद ठाकरे हे तात्काळ संस्थेत दाखल झाल्यावर खासदार धानोरकर यांनी निवडणूक संबंधित कागदपत्रांची मागणी केली, यावर ठाकरे यांनी असमर्थता दाखवीत नियमाप्रमाणे ते कागदपत्रे निवडणूक अधिकाऱ्याकडून घ्यावे लागेल असे सांगितले, मात्र खासदार धानोरकर ठाकरे यांचेवर संतापले व तू मला शिकवतो काय, कागदपत्रे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी ठाकरे यांना दिली.
इतकेच नव्हे तर खासदारांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याशी धक्काबुक्की केली, खासदार धानोरकर हे ठाकरे यांच्या अंगावर येत त्यांच्या अंगरक्षकाने मध्यस्ती केली. Congress mp dhanorkar
एका जनप्रतिनिधीने अश्या प्रकारची वर्तणूक न शोभण्यासारखी आहे, यावर ठाकरे यांनी भद्रावती पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
भद्रावती पोलिसांनी खासदार धानोरकर यांचेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. Bhadravati Co-operative Society)
याबाबत खासदार धानोरकर यांचेशी सम्पर्क साधला असता सम्पर्क होऊ शकला नाही.
भद्रावती विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित चे व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांनी सुधीर पिदूरकर, सतीश नगराळे, राजू टाले व उमेश जीवतोडे यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत खासदार धानोरकर यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली.
कांग्रेस सारख्या अहिंसक पक्षात खासदारांची असल्या प्रवृत्तीने संस्थेचे व्यवस्थापक गोविंद ठाकरे घाबरले आहे.
