News 34 chandrapur
राजुरा - राजुरा तालुक्यातील पंचाळा गावात कुत्रा घरात आला म्हणून या क्षुल्लक वादात एका युवकाला आपला जीव गमवावा लागला.
पंचाळा गावातील शेजारी राहणारे मडावी व भोंगळे कुटुंबाचा मागील काही दिवसांपासून भांडण सुरू आहे. The dog caused the murder
21 एप्रिलला सायंकाळी 35 वर्षीय गणेश मडावी हा आपल्या घरी आला, मडावी यांचे घरी कुत्रा पाळण्यात आला होता, गणेशने सायंकाळी त्या कुत्र्याला फिरण्यासाठी सोडले, कुत्रा हा बाहेर न जाता सरळ भोंगळे यांच्या घरी गेला, भोंगळे यांनी त्या कुत्र्याला बाहेर हाकलून लावले, सदर प्रकार बघता गणेश संतापला व भोंगळे यांच्याशी वाद घालू लागला. Murder
वाद विकोपाला पोहचताच गणेश ने 50 वर्षीय प्रभाकर भोंगळे यांना मारहाण करायला सुरुवात केली. Murder of a youth
वडिलांना मारहाण होत असल्याचे बघितल्यावर 21 वर्षीय मुलगा रोहित भोंगळे यांनी पावडा हातात घेत गणेश च्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
डोक्यावर अचानक झालेल्या वाराने गणेश खाली कोसळला, त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.
गणेशला तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत गणेशचा मृत्यू झाला.
गणेशची हत्या केल्याप्रकरणी विरुर स्टेशन पोलिसांनी 50 वर्षीय प्रभाकर भोंगळे, 21 वर्षीय रोहित भोंगळे व बायाबाई उर्फ ताराबाई भोंगळे यांना अटक केली. Trivial matter
पुढील तपास विरुर चे सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे.
