News34 chandrapur
चंद्रपूर - 2 वर्षे देशवासी कोरोनाच्या सावटाखाली राहिले असून या विषाणूने अनेकांचा नाहक बळी गेला होता, देशात कोट्यवधी नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. केंद्र व राज्य सरकारने नागरिकांवर निर्बंध लादले मात्र आता 31 मार्च रोजी संपूर्ण देश निर्बंधमुक्त होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. unrestricted india24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत पहिल्यांदा केंद्र सरकारने कोरोनासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यानंतर अनेकदा या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले होते. Unlock india नागरिक कोरोनावर आळा घालण्याच्या अनुषंगाने आता अनुकूल व्यवहार करीत असल्याचे मत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.
देशातील दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याने गृहमंत्रालयाने निर्बंध हटविणार असल्याचे जाहीर केले. Guidelines
सोशल डिस्टन्सिंगसह mask पुढेही आवश्यक राहील, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली, तर संबंधित राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवर तत्काळ तसेच सक्रिय कारवाई करणे अपेक्षित राहील. यासंबंधी वेळोवेळी आरोग्य मंत्रालयाकडून सूचना केल्या जातील, असे भल्ला म्हणाले. Decrease corona