News34
चंद्रपूर - 16 मार्च ला अभिषेक देशभ्रतार ला भेटायला गेलेल्या 20 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.
मृतक तरुणीच्या मित्र व कुटुंबीयांनी सदर मृत्यू सामूहिक अत्याचार संबंधित असल्याचा आरोप केला, पोलीस प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात असून याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी माजी खासदार अहिर यांनी केली होती.
suspicious death
4 दिवसांनी युवतीच्या मृत्यू प्रकरणात विविध घडामोडी घडल्या, सदर युवतीचा मृत्यू हा अपघातानेच झाला असल्याची माहिती पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश कोंडावर यांनी दिली.
प्रेम प्रकरणात breakup करायचं आहे असे सांगत अभिषेकने तरुणीला भेटायला बोलाविले होते, मात्र काही वेळात तरुणीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती, घटनास्थळी आक्षेपार्ह वस्तू सुद्धा पोलिसांना मिळाल्या होत्या. (News34 follow Google news)
युवतीच्या मृत्यूप्रकरणी विविध तर्क वितर्क लावण्यात आले होते, पडोली पोलिसांनी तपासाला वेग देत युवतीच्या मृत्यूचे नेमके कारण पडताळून बघितले व त्यात पोलिसांना यश ही प्राप्त झाले.
युवतीच्या मित्राने सांगितले की पांढऱ्या रंगाच्या वाहनाने हा अपघात घडला होता, पोलिसांनी शहरातील विविध भागात असलेल्या cctv कॅमेऱ्याच्या माध्यमातून फुटेज तपासले असता संशयित वाहन पोलिसांना आढळून आले.
या प्रकरणात पडोली पोलिसांनी मूल प्रभाग 15 मध्ये राहणाऱ्या गणेश कोटगुले याला अटक केली.
गणेशने याबाबत पोलिसांना कबुली जबाब देत अपघातात त्या युवतीचा मृत्यू झाला, ले-आउट चा रस्ता लहान असल्याने रस्त्याच्या कडेला तरुणी उभी होती, वाहन वेगात असल्याने अनियंत्रित होऊन समोरील भागात ती युवती धडकली.
सदर वाहनांच्या धडकेत युवतीला जबर मार लागला ज्यामुळे रक्तस्राव व अंतर्गत मार लागल्याने त्या युवतीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, पोलिसांनी गणेश ला अटक करीत बोलेरो वाहन जप्त केले.
सदर वाहन हे हार्डवेअर च्या दुकानातून तार घेऊन जात असताना हा अपघात घडला.
मात्र युवतीच्या भावाने बहिणीवर अत्याचार करून ठार मारल्याचा संशय व्यक्त करीत तक्रार नोंदवली आहे.