News34
चंद्रपूर दि. 15 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 6 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी मृत्यु संख्या शुन्य आहे. Corona cases
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.
Chandrapur local news
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 954 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 384 झाली आहे. सध्या 3 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 88 हजार 563 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 88 हजार 327 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Chandrapur latest update
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. Appeal to the administration
