News34 गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशन (मुक्या प्राण्यांचा माहेरघर) येथे नेफडो च्या जिल्हा संघटिका कविता मोहुर्ले यांनी त्यांना अनेक वर्षांपासूनच मुके प्राण्याबद्दल (खास करून कुत्रे) खुप आपुलकी आहे.त्यांचे घरी रुबी आणि तिचा मुलगा भैरव हे दोघे असल्याने त्यांच्यात एक नातं तयार झालं आहे.
Pyar foundation chandrapur
Pyar foundation chandrapur
त्यांची एक इच्छा झाली की मी माझा वाढदिवस अशा अनेक मुक्या प्राण्यांमध्ये साजरा करावा अशी इच्छा असल्याने त्यांनी चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशन च्या रुपाने ती इच्छा पूर्ण झाली.ही एक अशी संस्था आहे कि जिथे अनाथ, आजारी, अपघात ग्रस्त आणि मालकाने टाकून दिलेल्या मुक्या प्राण्यांना आसरा देऊन त्यांच्या वर औषधोपचार आणि पालनपोषण करते.Silent animals
संस्थचे मुख्य श्री. रापेल्ली आणि तेथे सेवा देणाऱ्या मुलांचे मनोगत एकुण मोहुर्ले मॅडम यांचे मन भरून आले. सर्वांसमोर श्री. रापेल्ली यांना शब्द दिला कि महिण्यातुन एकदा तरी प्यार फाऊंडेशन ला भेट देऊन सेवा द्यायची आणि मिळणाऱ्या पेंशनमधुन काही रक्कम मुक्या प्राण्यांना द्यायची. वाढदिवसानिमीत्य रोख २०००/,पेडीग्री बॅग, तांदूळ, तांदूळ कणी,ब्रेडचे पॉकेट आणि काही जुनी कपडे असे साहित्य मोहुर्ले मॅडम यांनी भेटस्वरुपात फाऊंडेशन ला दिले.प्रत्येकानी श्री. रावेल्ली यांचेशी संवाद साधला.त्यांनी पण आपल्या संपूर्ण टीम कडून मदतीचं आश्र्वासन घेऊन सर्वांशी संवाद साधला. Birthday celebration
प्रसंगी तेजस्विनी नागोसे महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, रत्ना चौधरी नागपूर विभाग महिला सचिव, ललिता मुस्कावर चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष, कविता मोहुर्ले चंद्रपूर जिल्हा संघटिका,श्रीरंग नागोसे जिल्हा संघटक, गुरुदास चौधरी, जिल्हा संघटक,मूल तालुका संघटिका नंदा शेंडे,इंदू मांदाडे,पुजा मोहुर्ले, चंद्रपूर तालुका महिला अध्यक्ष सुरेखा बोमनवार, चंद्रपूर तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री सोनुले, तालुका संघटिका वर्षा ढवस, महानगर पालिका नगरसेविका वंदना तिखे,पर्यावरण प्रेमी प्रकाश शेंडे उपस्थित होते.
