News 34 chandrapur
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील दारू दुकानांमुळे महिला, विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारू दुकान मालक शासनाचे नियम पायदळी तुडवित मनमर्जीने कारभार करीत आहेत. यासंदर्भात परिसरातील महिलांनी राज्य उत्पादन शूल्क (State excise duty) विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मनोज पाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सदर दुकान हटविण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उभी बॉटली-आडवी बॉटलीसाठी मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. Shivsena leader
यावेळी सदर दुकान हटविण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उभी बॉटली-आडवी बॉटलीसाठी मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. Shivsena leader
शहरातील बंगाली कॅम्प परिसरात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दारूबंदी उठल्यानंतर या परिसरात श्री. राऊत, श्री. मारपल्लीवार, श्री. खोब्रागडे यांनी दारू दुकाने सुरू केली आहेत. या दारू दुकानाच्या काही अंतरावर शाळा आहे. तसेच नागरी वस्ती आहे. त्यामुळे या रस्त्याने महिला, शाळकरी विद्यार्थिनींची नेहमीच ये-जा असते. परंतु, मद्यपींचा रस्त्यावर गोंधळ राहत असल्याने महिला, विद्यार्थिनींना (student) मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शूल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली. महिलांनी मोर्चाही काढला. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर संतप्त महिलांनी दारू दुकानांमध्ये प्रवेश करून संताप व्यक्त केला. याप्रकाराची पोलिस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली आहे. (Harassment of women in the liquor store)
परंतु, दारू दुकान मालकांकडून महिला, विद्यार्थिनींना त्रास कमी होण्यासंदर्भात कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही दारू दुकाने दुसरीकडे स्थानांतरित करावी. यासाठी उभी बॉटली-आडवी बॉटलीसाठी मतदान घेण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मनोज पाल यांच्यासह नगरसेवक अजय सरकार व अन्य कार्यकर्ते यांचा समावेश होता. याबाबतचे निवेदन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सादर करण्यात आले आहे.
