News 34 chandrapur
चंद्रपूर - सामाजिक संस्थेतर्फे चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना अनैतिक देहव्यापार अड्ड्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने सदर तपास पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.याबाबत परिपूर्ण माहिती घेत पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पथक तयार करीत पुढील तपास सुरू केला. Lcb chandrapur
चंद्रपूर शहर हद्दीतील गौतम नगर परिसरात देहव्यापार चालविणाऱ्या महिलेने एका मुलीकडून देहव्यापार करीत आर्थिक फायदा घेत होती, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने डमी ग्राहकांच्या माध्यमातून गौतम नगर परिसरातील देहव्यापार अड्ड्यावर धाड मारली असता सदर महिला ही 3 मुलींकडून जबरदस्ती देहव्यापार करीत आर्थिक फायदा घेत होती.
स्थानिक गुन्हे शाखेने गौतम नगर स्थित देहव्यापार अड्ड्यावरून 3 पीडित मुलींची सुटका महिला पोलिसांच्या मार्फत करीत त्यांना स्त्री आधार केंद्रात पाठविण्यात आले. Prostitution
आरोपी महिले विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे कलम 370, 370 अ, 371 भांदवी सहकलम 3, 4, 5, 6 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक (human trafficking) अधिनियम 1956 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. Rescue operation
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोउपनी अतुल कावळे, स्वामी चालेकर, धनराज करकाडे, सुधीर मत्ते, प्रमोद कोटनाके, दीपाली देवांग, वर्षा भगत, श्वेता डाहुले यांनी पार पाडली.