प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जोपासून ग्रामीण खेड्यातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी चिकित्सक पद्धतीने मार्गदर्शन केल्यास नवीन संशोधक तयार होतील असे विचार शिक्षण प्रसारक मंडळ मुलचे अध्यक्ष एड.बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. संशोधन पद्धती व माहिती विश्लेषण या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी संचालित डॉ.आंबेडकर वरिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर आणि गोंडवाना विद्यापीठ संलग्नित यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी २०२२ रोजी चंद्रपूर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे सचिव श्री.कुणाल घोटेकर होते. प्रमुख अतिथी कर्नाटक येथील डॉ.टी. व्ही.कांतांमनी, व मार्गदर्शक म्हणून डॉ. शाम कोरेट्टी हे online पध्दतीने उपस्थित होते. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.राजेश दहेगावकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा,व संशोधनाचे बारकावे याबाबत माहिती समजावून सांगितले. कार्यशाळेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामधून श्री.कुणाल घोटेकर यांनी संशोधन पद्धतीवर आयोजित केलेली कार्यशाळा वर्तमान स्थितीत अतिशय महत्त्वाची आहे असे सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
पहिल्या सत्रातील प्रमुख अतिथी व मार्गदर्शक कर्नाटक येथील डॉ.टी. व्ही.कांतांमनी यांनी आपल्याच मातृभाषेतून करण्याचा सल्ला देत संशोधन हे चिकित्सक असावे असे सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. शाम कोरेट्टी यांनी संशोधनाच्या पद्धती व माहिती विश्लेषण व संकलन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.मिता रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रकाश शेंडे यांनी संशोधन पद्धतीचे साधे व सोपे टप्पे उपस्थितीतांना समजावून सांगितले. डॉ. मिता रामटेके यांनी History विषयात संशोधन करतांना कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची,मुलाखत कधी घेतली जाते, आणि मार्गदर्शक प्राध्यापकांच्या जबाबदाऱ्या तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल मार्गदर्शन केले. समारोपीय प्रसंगी लाभलेले आंबेडकर सोसायटीचे सदस्य एड.राहुल घोटेकर जे स्वतः संशोधक विद्यार्थी आहेत त्यांनी स्मार्ट पद्धतीचा वापर करताना कसा करायचा संशोधनातील महत्वपूर्ण मुद्यावर आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनीही आपल्या मार्गदर्शनात कुठलेही संशोधन करणे हे कठीण तपश्चर्या आहे. त्यासाठी सखोल अशी माहिती मिळवून लिखाणाला सुरुवात करावी असे समजावून सांगितले. आयोजित केलेली कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा.मनोज सोनटक्के, प्रा.गजानन घुमडे, डॉ. मिलिंद भगत,यांचेसह कर्मवीर महाविद्यालय व डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेला संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांना या कार्यशाळेत मिळालेली माहिती अत्यंत मोलाची व उपयोगी ठरणारी होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
