News34 chandrapur
पेठ वडगांव : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. Chatrapati Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राचे Governor Bhagat Singh Koshari यांनी एका कार्यक्रमात महाराजांचा Single mention एकेरी उल्लेख करीत त्यांच्याबाबत चुकीची माहिती दिली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांनी जाहिर माफी मागावी अथवा पदाचा Resigned द्यावा अशी मागणी भारतीय मराठा महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले "छत्रपती शिवाजी महाराज" हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत.
महाराजांच्यावर राजमाता जिजाऊनी संस्कार केले त्या आधारावर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आहे.
राज्यपालांनी आपल्या पदाचा मान ठेवून वक्तव्य करायला पाहिजे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण स्तरांमध्ये छ.शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे छ.शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणीही विधान करताना जबाबदारीने आणि विचारपूर्वकच करणे गरजेचे आहे.
