News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत जनतेने निवडून पाठवलेले नगरसेवक हे जनतेचे "वैरी की कैवारी" हेच कळेनासे झाले.याठिकाणी सुरू असलेला अनागोंदी व मनमानी कारभारामुळे वैताग आल्याची भावना व्यक्त असून "हम करे सो कायदा" प्रमाणे सत्ताधारी वागत असल्याचे आरोप होत आहे.
अगोदरच कोरोनाने कंबरडे मोडले आता सत्ताधाऱ्यांनी काढलेला टॅक्सवर 2 टक्के interest वसुलीचा फर्मान जिव्हारी लागला आहे. "वाट दिसू देरे देवा,गाढ सुटू दे" अशी याचना नागरिक करीत आहे.टॅक्सवर व्याज वसुली ! सत्ताधाऱ्यांचे हे फर्मान जनहिताचे नसून अन्यायकारक आहे.याविषयी असंतोष उफाळून आला असून जनतेचे हित लक्षात घेता आगामी सर्वसाधारण सभेत सदर विषय रद्द करावा अशी मागणी वजा विनंती नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी निवेदनाद्वारे नगराध्यक्षाकडे केली आहे.कोरोना काळात शासनाने लॉकडाऊन लावले.यामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते, लहान,मोठे व्यापार पुर्णपणे बंद होते.अशा परिस्थितीत कित्येक जण tax भरू शकले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक,सामाजिक संस्था, विवीध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन देत गोरगरिबांना विवीध माध्यमातून मदतीचा हात दिला. असे असताना नगरपरिषदेने किमान बीपीएल धारकांचे टॅक्स माफ करावे अशी मागणी विरोधी नगरसेवक डोहे यांनी नगराध्यक्षाकडे निवेदनाद्वारे केल्याचे कळते,मात्र याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही,उलट सरसकट सर्वांकडून थकलेल्या टॅक्स व्याजासह वसूल करण्याचा निर्णय सभागृहात यांनी घेतला.हे पुर्णपणे चुकीचे असून जनतेचे आर्थिक budget बिघडवणारा आहे. या निर्णयामूळे न.प.विरोधात सर्वसामान्य जनतेत कमालीचा रोष पहायला मिळत आहे.ही बाब लक्षात घेता आगामी सर्वसाधारण सभेत सदर विषय रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी डोहे यांनी नगराध्यक्षाकडे केली आहे.जर याविषयी सकारात्मक नाही घडले तर नगरसेवक डोहे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.