News34 chandrapur
कोरपना - 2 वर्षांपासून देशात थैमान घातलेल्या कोरोनाने आता मोठ्या प्रमाणात विश्रांती घेतल्याने निर्बंध हटविण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप बघता नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अनेकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला मात्र ज्यांनी लसीकरण केलं नाही त्यांनासुद्धा लसीकरणाचे संदेश मिळाले.
सध्या चंद्रपूर जिल्हा लसीकरणात अग्रेसर आहे मात्र अश्या प्रकाराने लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.Covishield vaccine
10 जुलै 2021 मध्ये पुष्पा दत्तू बोरकुटे या महिलेला हृदयाघाताने मृत्यू झाला होता, अचानक त्यांना हृदयाघात झाल्याने तात्काळ चंद्रपुरातील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले.Cowin vaccine
मात्र 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
26 फेब्रुवारीला दिवंगत pushpa बोरकुटे यांच्या मुलांच्या मोबाईलवर पुष्पा बोरकुटे यांचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्याचा मॅसेज आला.covid vaccine news
मॅसेज बघून प्रशांत बोरकुटे हे चक्रावून गेले आज त्यांच्या आईच्या मृत्यूला 6 महिने झाले असताना असा मॅसेज का आला.याची चौकशी प्रशांतने केली मात्र आधी त्यांना टाळाटाळ करण्यात आली.
विशेष म्हणजे प्रशांतला आईच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र ही मिळाले.covid vaccine certificate download india
प्रकरणी गंभीरता लक्षात घेऊन सदर प्रतिनिधींनी कवठाळा येथील वैद्यकीय अधिकार्याची भेट घेतली असता त्यांनी तांत्रिक चूक झाल्याचे मान्य केले मात्र कैमरे पुढे त्यांनी बोलायला नकार दिला. covid vaccine certificate
सदर प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा हा गौडबंगाल तर नाही ना? असा संशय सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. प्रशांतने या प्रकरणी चौकशीची करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.covid vaccine india