चंद्रपूर - ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महाकृषि ऊर्जा धोरण 2020 नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून फक्त निम्मी थकबाकी भरून, थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ 21 दिवस राहिले असून कृषी धोरणाअंतर्गत ग्राहकांनी 31 मार्च पुर्वी थकबाकी भरल्यास त्यांना 66 टक्के माफीची सुवर्ण संधी 31 मार्चपर्यंत असल्याने 31 मार्चपुर्वी सवलतीत थकबाकी भरून कृषिग्राहकांनी आपले वीजबिल कोरे करून घेण्याची संधी साधण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
Mahakrishi Energy Policy
तसेच कृषिग्राहकांना वीजबिलबाबत काही तक्रारी असल्यास, त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण होण्यासाठी,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मध्ये /मंडळात, दिनांक 10 ते 15 मार्च दरम्यान, तालुका /उपविभागनिहाय मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहेत. कृषिवीजबिल थकबाकी व वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण होने असा दुहेरी लाभ, कृषिग्राहकांना एकच छताखाली लाभणार आहे. Msedcl
महाकृषि ऊर्जा धोरणातून चंद्रपूर परिमंडळात, आजपर्यंत 45 हजार 466 कृषिग्राहकांनी थकबाकीमुक्त होण्याच्या दिशेने पाउुल टाकले व त्यांच्याकडून 44 कोटी 15 लाख भरण्यात आले तसेच 21 हजार 568 कृषिग्राहकांनी आपले वीजबिल कोरे करुन घेण्याची संधी साधली आहे व त्यांनी त्यापोटी 23 कोटी 55 लाख भरत महावितरणप्रती विश्वास दाखविला आहे. Agricultural electricity bill
याच योजनेचा परिपाक म्हणून आता जसजशी 31 मार्च जवळ येत आहे तसे कृषिग्राहक थकबाकी मुक्ती कडे पाऊले टाकत आहेत. Arrears free
मेळाव्यांची वेळ, दिनांक आणि स्थळ :-
चंद्रपूर मंडळ कार्यालय:-
अंतर्गत चंद्रपूर, बल्लारशा व वरोरा विभागातील - चंद्रपूर, बल्लारशा व वरोरा उपविभागात दिनांक 10 मार्च रोजी, चंद्रपूर उपविभाग 3, गडचांदूर आणि भद्रावती येथे दिनांक 11 मार्च ला, मूल, राजुराव चिमूर येथे 12 मार्चला, सावली व गोंडपिपरी येथे 13 मार्चला, चंद्रपूर उपविभाग 1व 2 तसेच पोंभुर्णा येथे 14 मार्चला हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
******************
गडचिरोली मंडळ कार्यालय:-
गडचिरोली, ब्रम्हपुरी व आलापल्ली विभागातील,
सिरोंचा व कुरखेडा उपविभाग येथे दिनांक 10 मार्चला. चामोर्शी, आरमोरी व ब्रम्हपुरी येथे दिनांक 11 मार्च रोजी तसेच आलापल्ली, वडसा, नागभीड येथे दिनांक 12मार्चला तर एटापल्ली, कोरची व सिंदेवाही येथे 13मार्चला. मुलचेरा व धानोरा येथे दिनांक 14 मार्च ला. तर 15 मार्चला गडचिरोली, येथे सदर मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.