News34 mu
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा कोसंबी येथील शेतकरी महिला सौ.ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले वय (५५) ही आपल्या स्वतःच्या शेतात लाखोरी खोदत असतांना शेतातच वाघाने पाठीमागून महिलेवर हल्ला करुन माणेलाच पकडून ५० मीटर अंतरावर ओढत नेऊन जागीच ठार केल्याची घटना दिनांक १८/२/२०२२ रोजी दुपारी ४ वाजता घडली.Tiger killed woman
मौजा कोसंबी येथील शेतकरी महिलेचे शेत गावापासून स्मशान भूमीकडे जाण्याच्या रस्त्यालगत १ किलोमीटर अंतरावर असून स्वतःच्या शेतात लाखोरी खोदत असतांना पाठीमागून महिलेवर हल्ला करुन ठार केले. याबाबतची माहिती कोसंबी वासीयांना कळताच गावातील होतकरु सरपंच रवींद्र कामडी, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम व गावकरी लगेच घटनास्थळी धाव घेतली. Tiger attack chandrapur
घटनेची पोलीस स्टेशन मुल यांना दिली असता पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत हे आपल्या सहकारी यांचेसह घटनास्थळ गाठले. याबाबतची माहिती वनविभागाला देताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खणके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनरक्षक श्री.मरसकोल्हे, तात्काळ घटनास्थळी पोहचून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठविण्यात आला असून वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे मॅडम यांनी मृतकांच्या नातेवाईकास तात्काळ ३०,००० (तीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली. पुढील तपास वनविभागाच्या वतीने प्रियंका वेलमे मॅडम आपल्या कर्मचारी यांच्या सहकार्याने करीत आहेत तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. Breaking news
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसात तिघांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.
सध्यस नागरिकांचा वनविभागावर चांगलाच रोष आहे.
