News34 gadchandur
गडचांदूर :- गडचांदूर प्रभाग क्रं.2 येथील रहिवासी पल्लवी शुभम पेंढारकर ही महिला गरोदर असताना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घरावर कपडे वाळत घालत असताना घरावरून गेलेल्या 33 हजार हाय व्होल्टेजच्या विद्युत ताराचा करंट voltage लागल्याने मोठ्याप्रमाणात भाजली होती.
Teachers
या घटनेत तिने एक हात गमवला असून तिने एक महिन्यापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सूज्ज्ञ नागरिकांनी या महिलेच्या पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती करण्यात आली होती. Relief
ही बाब लक्षात घेऊन सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून 11 फेब्रुवारी रोजी या महिलेला रोख रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे,ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे,प्रा.जहीर सैय्यद, लीलाधर मत्ते,सिताराम पिंपळशेंडे,गणपत आत्राम इत्यादींची उपस्थिती होती.
