चंद्रपूर - लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांच्या आग्रहावरून चंद्रपूर जिल्हयामध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. मात्र आताच्या तिन तिघाडा काम बिघाडा या महाभकास आघाडी सरकारने षडयंत्र रचुन चंद्रपूर जिल्हयातील liquor ban दारूबंदी करून त्या पाठोपाठ सुपरमार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिली हा निर्णय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार त्याच प्रमाणे वैयक्तीक, कौटूंबिक व सामाजिक जीवन उध्वस्त करणारा आहे.
या दारूने कित्येकांचे बळी घेतले आहे. सुखी संसार उध्वस्त केले आहे. त्यामुळे सुपरमार्केटमधून सुरू करण्यात आलेली वाईन विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी भाजपा महिला आघाडी द्वारे बल्लारपूर येथे करण्यात आले. Bjp Chandrapur
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्या सौ. रेणुका दुधे, बल्लापूर शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, चंद्रपूर महानगर भाजपा उपाध्यक्ष सौ. भारती दुधानी, पुर्व विदर्भ सोशल मिडीया प्रमुख लक्ष्मी सागर, युवा मोर्चा उपाध्यक्ष मोहीत डोंगरे, कांता ढोके, संध्या मिश्रा, आरती आक्केवार, शबाना खान, पुष्पा टिकले, प्रियंका शेंडे, किरण पेडन्टीवार, कविता सरकार, गुलशन खान, वनमाला दौड, वनिता चक्रवर्ती, सुवर्णा भटारकर, जयश्री मोहुर्ले, उर्मिला घोडमारे, माला मानुसमारे, शैला तावाडे, शितल निषाद, वैशाली बुरांडे, चंदा बहादे, बबीता बहुरीया, सविता नगराळे आदींची उपस्थिती आहे.
महाविकास आघाडी सरकारने किराणा Supermarket wine sales सुपरमार्केटमधून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णया विरोधात राज्यभरामध्ये महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तथापि, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या जळगांवमध्ये गेल्या असता पत्रकारांनी त्यांना सुपरमार्केटमधुन वाईन विक्रीला महिलांचा विरोध आहे असा प्रश्न विचारला असता, मला कोणत्याही महिलांनी वाईन विक्रीबद्दल तक्रार केलेली नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे त्यांना या गंभीर समस्येची जाण नाही. त्यामुळे महिला भाजपा महाराष्ट्र प्रदेश द्वारा राज्यभरातुन महिला आयोगाला पत्र पाठविण्याचे ठरले, असून तरूण पिढीला या विकृत संस्कृतीतुन वाचवायचे आहे. महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारने सुपरमार्केटमधून वाईन विक्रीचा निर्णय घेतला हा निर्णय समस्त महाराष्ट्राचा अभिमान संस्कृतीची अवहेलना करणारा निर्णय आहे. सुपर मार्केट हे दवाखान्याजवळ, शाळेजवळ, मंदिराजवळ, लोकवस्तीत, गजबजलेल्या परिसरात असते. त्यामुळे महिला, लहान मुलं यांच्या मनावरती वाईट परिणाम होते. त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा भाजपा महिला आघाडीद्वारे महिलांच्या सन्मानार्थ व समाज स्वास्थ्यासाठी सुपरमार्केटमधून वाईन विक्रीच्या विरोधात राज्यभर रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करू. हा निर्णय मागे घ्यायला सरकारला भाग पाडू, असे वनिता कानडे यांनी म्हटले आहे. यावेळी महिला आघाडीद्वारे बल्लारपूरचे तहसिलदार संजय राईंचवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
