News34 Chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील दारूबंदीच्या काळात अवैध दारूचा महापूर तर आता सुगंधित तंबाकू माफिया प्रतिबंधित वस्तूचा धंदा करण्यास सक्रिय आहे.या सुगंधित तंबाखूच्या व्यापारात अनेक राजकीय लोकांची वरदहस्त असून माफिया राजकीय संरक्षणात हा जीवघेणा तंबाखू जिल्ह्यात विक्री करीत आहे.
आता सुगंधित तंबाखू च्या गोत्यात चंद्रपूर शिक्षकसेना जिल्हाप्रमुख ही गोत्यात आला आहे.
शिक्षकसेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू यांनी राजकारणासह पत्रकारितेमध्ये एन्ट्री घेतली, 1 फेब्रुवारीला जटपुरा गेट येथील शुभम ट्रेडिंग कंपनी मध्ये सुगंधित तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती नायडू यांना मिळाली, मात्र पोलीस व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांना सोबत न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांची साथ घेत शुभम ट्रेडिंग कम्पनी येथे प्रवेश करीत व्हिडीओ शूट केला.
यानंतर दुकानाचे संचालक शुभम लोणकर यांनी नायडू, चिराग नथवाणी व जाबिर मुबारक शेख यांच्यावर पैश्यासाठी त्रास दिला म्हणून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. Fragrance tobacco
या सर्व घडामोडीनंतर आज नायडू यांनी पत्रकार परिषद घेत लोणकर यांनी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करीत सर्व आरोप फेटाळून लावले.
आम्ही याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेत घडलेला प्रकार व व्हिडीओ क्लिप्स त्यांना दाखवीली मात्र त्यानंतर ही लोणकर यांचेवर कारवाई झाली नाही.
1 फेब्रुवारीला व्हिडीओ शूट केल्यावर नायडू यांनी तसे वृत्त ही प्रकाशित केले होते, नायडू यांचे म्हणणे आहे की जर पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वेळेवर पोहचले असते तर सर्व माल त्यांना जागेवर मिळाला असता, अधिकारी 2 तास उशिरा आल्याने लोणकर यांनी तो माल मागच्या दरवाज्यातून बाहेर काढला.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहे, सत्ता आहे म्हणून आपण कुठेही शिरायचं का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.
आधीच जिल्ह्यात शिवसेना अनेक गटात विभागल्या गेली आहे.
शिवसेनेचे सर्व गट आपली वेगळी चूल मांडून बसले आहे. Shivsena news
अश्यातच शिक्षकसेना जिल्हाप्रमुखाचा हा प्रकार पदाला न शोभणारा आहे.
अवैध काम होत असेल तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह त्या जागी धाड मारीत माल पकडून पोलीस प्रशासन येतपर्यंत वाट बघायला हवी होती.
मात्र तसे काही झाले नाही त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेतले.
पुन्हा जिल्ह्यातील शिवसेना या प्रकाराने गोत्यात आली असे म्हणायला हरकत नाही.