News34 Gadchandur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे शिवजयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे समाजसेवक,जेष्ठ नागरिक,सेवानिवृत्त शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक,आशा वर्कर्स तसेच प्रभागातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात गडचांदूर न.प.च्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम,न.प.चे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर,समाजसेवक मनोज भोजेकर,नगरसेवक अरविंद मेश्राम,नगरसेविका मीनाक्षी एकरे,विठ्ठल गोरे, महादेव एकरे,सुरेखा गोरे,सुधाकर ताजणे इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व समाज सेवकांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवजयंती उत्सव समिती अभिनव सामाजिक संस्था तसेच क्रीसिल फाउंडेशनच्या माध्यमातून बँकेकडून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली.मनी वाईज क्रिसिल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा विमायोजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमायोजना तसेच ई-श्रम कार्ड,बँकेची बचत, investment तसेच digital bank व्यवहार व सुरक्षा आणि बँकेच्या एकूण कार्यप्रणाली संदर्भात सेंटर मॅनेजर विठ्ठल नवले व फिल्ड समन्वयक अतुल गोरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. संचालन महाडोळे, प्रास्ताविक अतुल गोरे,आभार सतीश बिडकर व मयूर एकरे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजू चिकटे,तुकाराम चिकटे,पवन ताजने, बादल पेचे,मेघराज एकरे,आदित्य मंगरूळकर सह शिवजयंती उत्सव समितीचे इतर पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
