News34 chandrapur
ऊर्जानगर (चंद्रपूर):- महाराष्ट्र राज्य विघुत कर्मचारी,अभिंयते व अधिकारी राज्यस्तरीय संघर्ष समितीच्या वतिने संपूर्ण महाराष्ट्रभर द्वारसभा घेण्यात आली त्याच धर्तीवर Power Employees Union संयुक्त कृती समिती सीटीपीएस चंद्रपूर द्वारा सुधारित विघुत कायद्या-२०२१ ला विरोध,जल विद्युत केंद्र हस्तांतरण थांबविणे,देशात विज क्षेत्रांत होणारे privatization थांबविणे इत्यादी मागण्याकरीता तसेच दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत जनजागृतीसाठी chandrapur thermal power station चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जाभवन गेट समोर दुसऱ्यांदा दि.२५.०२.२०२२ ला व्दारसभा घेण्यात आली.
या व्दारसभेला बहुजन पावर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस ऍड राजन शिंदे ,महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुभाष शेडमाके, ग्रॅच्युएट इंजिनियर्स असोसिएशनचे विभागीय सचिव सुशील लांबट,सर्बोडिनेट इंजिनियर्स अशोसिएशनचे पुंडलिक आरिकर ,विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे उत्तम रोकडे, सुनील भुयार, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे गोविंदसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर बोकडे, महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे मिलिंद कोटरंगे, राजेंद्र लहाने ,पावर फ्रंटचे देवराव नवघरे,प्रकाश वाघमारे, आफ्रोड संघटनेचे सूरज मसराम, आदिवासी विद्युत कर्म संघटनेचे ओंकार गेडाम, असोसिएशन आफ केमिस्टचे नितीन झामनानी, कंत्राटी कामगार संघटनेचे सीटुचे वामण बुटले, ईटंकचे नित घोष पावर फ्रंटचे युवराज मैंद व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांने विस्तृत संबोधित करून घोषणाबाजी केली. यावेळी दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत सर्व कर्मचाऱ्यात जनजागृती करण्यात आली.या द्वारसभेला विशेष करून कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
या द्वार सभेचे सुञसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे यांनी केले तर आभार विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे अनिल दौडकर यांनी मानले या सभेला चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या संघटना संयुक्त समितीचे अरुण पोहरे,अमोल मोंढे, देवराव कोंडेकर ,विजय भोयर,विजयसिंग राठोड , कुमरे,राजेश आत्राम,दिलीप मोहोड,रविंद्र पुसाम व सर्व सघंटनाचे पदाधिकारी व सभासद ,कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
