News34 Chandrapur
चंद्रपूर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताचे औचित्याने १९ फेब्रुवारी रोजी आयोजित लुंबिनी नगर, तुकूम येथे छोटेखानी कार्यक्रमात हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल Kung Fu Karate /Karate Championship स्पर्धेत सहभागी होऊन चंद्रपुर शहरातील एकूण १० विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावून चंद्रपुर चे नाव लौकिक केले त्यामध्ये ६ Gold मेडल्स, ३ सिल्वर व एक कास्य पदक विद्यार्थ्यांनी मिळवून दिले.
यानिमित्ताने त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी युवासेना जिल्हा चंद्रपुर च्या जिल्हाप्रमुख प्रा निलेश बेलखेडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून मानवंदना देण्यात आली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून शिवसेना नगरसेवक सुरेशभाऊ पचारे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या वतीने प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपुर जिल्हा कुंगफू/कराटे असोसिएशन यांच्या वतीने मास्टर सतिश भडके यांनी केले. यावेळी कुंगफु मास्टर चंदू गुरीले, युवासेना शहर समन्वयक करन वैरागडे, युवासेनेचे अश्विन देवतळे, प्रदिप शिवनकर यांची उपस्थिती होती.
