चंद्रपूर - बुधवारी रात्री चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कुणाल एन्टरप्रायजेस मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांचेवर वाघाने हल्ला करीत ठार केले.
चंद्रपुरातील वीज केंद्र परिसरात जंगल व्याप्त परिसर असून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामध्ये अस्वल, बिबट व वाघ हे हिंस्त्र प्राणी अनेकदा फिरताना नागरिकांना दिसले.
वर्षं 2021 ला ऑगस्ट महिन्यात सीआयएसएफ कर्मचाऱ्याच्या 5 वर्षाच्याया मुलीवर बिबट्याने हल्ला चढवीत ठार केले होते. Tiger attack
त्यानंतर वीज केंद्राच्या कर्मचाऱ्यांवर वाघाने हल्ला करीत जखमी केले होते.
मात्र या सर्व घटनेनंतर वीज केंद्र प्रशासनाला जाग आली नाही, वीज केंद्रातील मुख्य अभियंता व कामगार कल्याण अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना प्रणित कंत्राटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. Chandrapur thermal power project
सिटीपीएस परिसरात वन्य प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात वाढणारा वावर याबाबत सिटीपीएस व वनविभाग प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार करीत बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही असा आरोप बंडू हजारे यांनी केला.
वीज केंद्रातील अधिकृत कर्मचाऱ्याला जी सुरक्षा वीज केंद्र देते तीच सुरक्षा कंत्राटी कामगारांना देण्यात यावी अशी मागणी हजारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मृतक मेश्राम यांच्या पत्नीला कायमस्वरूपी पेन्शन, मुलाला शासकीय विभागात नोकरी व मेश्राम कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी हजारे, कैलास तेलतुंबडे, अमोल मेश्राम व बागेसर यांनी केली आहे. Shivsena chandrapur
जर मागण्या मान्य झाल्या नाही तर शिवसेना कंत्राटी कामगार सेना सिटीपीएस प्रशासनाविरोधात 2 दिवसात आंदोलन उभारेल असा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
