News34 Mul
मूल (गुरू गुरनुले)
जनतेच्या अचल संपत्ती बाबत शासनाकडे असलेल्या दस्तऐवजांमध्ये विविध कारणांमूळे होणारे बदल टाळण्यासाठी व जमीन संदर्भातील महत्वाचे दस्तऐवज व आखीव पञीका पारदर्शी ठेवण्यासाठी शासनाने हस्तलेखनाची पध्दत बंद करून विकसीत केलेला प्रापर्टी डेव्हलपमेंट अमेंडमेंट साप्टवेअर मागील दोन महीण्यांपासुन बंद असल्याने राज्यातील जनतेला नाहक ञास सहन करावा लागत आहे.
जमीनी संदर्भात आँनलाईन पध्दत अंमलात आणल्या जात असतांना डिसेंबर २०२१ पासुन राज्याच्या महसुल विभागाव्दारे विकसीत केलेली प्रापर्टी डेव्हलपमेंट अमेंडमेंट साँप्टवेअर पध्दत सुधारणेच्या नांवाखाली बंद पडली आहे. पुणे येथील National Informatics Center (NIC) व्दारे राबविल्या जाणाऱ्या प्रापर्टी डेव्हलपमेंट साँप्टवेअर दोन महीण्यांपासुन सतत बंद असल्याने राज्यातील हजारो नागरीकांना नाहक ञास होत आहे. प्रापर्टी डेव्हलपमेंट अमेंडमेंट माँड्युलर प्रौसेस मध्ये तांञीक दोष निर्माण झाल्याने त्या दोषाचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंञणा कार्यरत आहे. असे मागील दोन महीण्यांपासुन सांगीतल्या जाते. परंतु अद्यापही निर्माण झालेला दोष दुर करण्यात संबंधितांना यश न आल्याने जमीनी संदर्भातील आखीव पञीका, पोटहिस्से पाडण्याच्या असे काही प्रकार दोन महीण्यांपासुन खोळंबुन आहे. खोळंबुन असलेल्या या प्रकारामूळे नागरीकांना मोठ्या प्रमाणांत ञास होत आहे. Property Development Amendment Software जनतेच्या अचल संपत्तीशी संलग्नीत असुन जनतेच्या संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही शासनाची असुन आर्थीक बाबतीत शासनाच्या हिताची आहे. असे असताना या साँप्टवेअरचा विकास आणि अंमलबजावणी कडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करीत असुन अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
जनतेचे हित आणि शासनाचे लाभ डोळ्यासमोर ठेवुन शासनाने विकसीत केलेला प्रापर्टी डेव्हलपमेंट अमेंडमेंट साँप्टवेअर दोन महीण्यांपासुन बंद असल्याने नागरीकांना ञास सहन करावा लागत आहे. त्यामूळे शासनाने विकसीत केलेला प्रापर्टी डेव्हलपमेंट साँप्टवेअर सुरू करून जनतेला सहकार्य करावे. अशी मागणी लोकसेवक म्हणुन जिल्ह्याचे पालकमंञी विजय वडेट्टीवार यांचे मार्फतीने राज्याचे महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांचे निदर्शनास आणुन दिली आहे. येत्या सात दिवसात याचे निराकरण होईल असे आश्वासन ना. बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.
संतोषसिंह रावत
अध्यक्ष. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
