चंद्रपूर - 15 मे 2019 ला शहरातील सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांनी रामनगर पोलीस स्टेशनला तब्बल 25 कोटी रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली.
असा आरोप त्या जेष्ठ नागरिकांनी लावला, सेवानिवृत्त झाल्यावर पैसे गुंतवायचे कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. Investment
अश्यातच गंजवार्ड येथे राहणारे पंकज पुरुषोत्तम फुलझेले, शिल्पा फुलझेले व धीरज फुलझेले यांनी मिळून औषधींचा व्यवसाय करण्यासाठी ओरियन बायोटेक नावाची कम्पनी स्थापन करीत सदर व्यवसायात भांडवलाची आवश्यकता आहे त्या मोबदल्यात पैसे गुंतवणूक करणाऱ्या मिळणाऱ्या नफ्यातून काही टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखविले. Orion Biotech Company
या आमिषाला बळी पडत तब्बल 100 ते 150 नागरिकांनी आपला पैसा गुंतविला, एकूण 20 ते 25 कोटी रुपये गुंतविल्यावर सुरुवातीचे 2 वर्षे फुलझेले दाम्पत्यानी नागरिकांना टक्केवारी नुसार पैसे दिले.
त्यानंतर पैसे देण्यास फुलझेले टाळाटाळ करू लागले.
यादरम्यान शिल्पा फुलझेले ह्या लहान बाळाला सोबत घेत पळ काढला.
त्यानंतर पंकज फुलझेले यांनी नागरिकांना पुढील तारखेचे धनादेश दिले मात्र ते वटले नाही.
यासंदर्भात Check bounce प्रकरणी नागरिकांनी कोर्टात प्रकरण नेले पंकज फुलझेले यांच्या विरोधात वारंट ही निघाले मात्र फुलझेले यांनी सुद्धा चंद्रपुरातून पळ काढला.
पैसे परत मिळणार नाही या धक्क्यात 5 नागरिकांचा मृत्यू झाला, रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आज तक्रार दाखल करून दीड वर्षाचा कालावधी लोटला मात्र पोलिसांनी आरोपी फुलझेले यांना अजूनही अटक केली नाही. Cheating case
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले मात्र आमच्या निवेदनाची आजपर्यंत दखल पोलीस प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी लावला.
